राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे अमळनेरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:33 IST2019-09-14T22:33:26+5:302019-09-14T22:33:31+5:30
अमळनेर : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने शासनाच्या महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी विविध ...

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे अमळनेरात मोर्चा
अमळनेर : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने शासनाच्या महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिरस्तेदार आर.एच.चौधरी यांना दिले.
महापरीक्षा पोर्टल रद्द करून पोलीस भरती आॅफलाईन सुरू करावी, ्रतसेच दरवर्षी १५ हजार पोलिसांची भरती करावी यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
मोर्चाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध फलक घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. संघटना पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.