राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फे महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST2021-01-04T04:14:01+5:302021-01-04T04:14:01+5:30

भाऊसाहेब राऊत विद्यालय जळगाव : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे ...

Nationalist Congress Party felicitates women | राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फे महिलांचा सत्कार

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फे महिलांचा सत्कार

भाऊसाहेब राऊत विद्यालय

जळगाव : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एल. एस. तायडे,पर्यवेक्षक एस. एम. रायसिंग, अरुणकुमार बाविस्कर, प्रकाश मेंढे, राजेश जाधव, धनराज सोनवणे व सागर हिवराळे उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन धनराज सोनवणे यांनी केले

शिक्षक भारती संघटना

जळगाव : शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य माध्यमिक संघटनेच्या शाखेतर्फे रविवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कोरोना काळात काम केलेल्या विविध क्षेत्रातील महिलांना `सावित्री फातिमा शेख कोरोना योद्धा` पुस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा शितल संजय जडे, डॉ. ममता काबरा नारायण वाघ, सोमनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संध्या साळुंखे, डॉ.शिरीष ठुसे, ज्योती गोसावी, सरला वाणी, विजया पाटील, स्वाती ढाके, कल्पना भालेराव, जयश्री कुरकुरे, वैशाली पाटील, मंगला सुलक्षणे, प्रभावती बावस्कर अशा १३ विविध क्षेत्रातल्या महिलांना गौरविण्यात आले.

Web Title: Nationalist Congress Party felicitates women