२५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:38+5:302021-09-04T04:21:38+5:30
आज लोकसेवा आयोगाची परीक्षा जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ...

२५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
आज लोकसेवा आयोगाची परीक्षा
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सकाळी १२ या वेळेत जळगाव शहरातील ३५ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून ११ हजार ४६३ परीक्षार्थी बसणार आहे. या परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण १ हजार १३० अधिकारी, कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आरोग्य शिबिर
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शनिवार सप्टेंबर सकाळी ११.३० वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १०.३० वाजता आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट (जळगाव) येथे ते भेट देणार आहेत. संध्याकाळी वाजता मेहुणबारे, ता. चाळीसगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन व राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाज मंदिर येथे आयोजित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.