मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे. बºहाणपूर (म.प्र.) पोलीस आश्रमाचे आचार्य आणि नीलेशची आई यांनी त्याला सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. उशिरा रात्री ते मुक्ताईनगरकडे निघाले. यापूवीर्ही तो घरून पळाला होता. तेव्हाही तो गोरखपूर येथेच मुलांच्या आश्रयालयात आढळला होता.नीलेश भिल पहिल्यांदा २०१७ मध्ये घरातून पळून गेला होता. तो परतल्यानंतर त्यास शैक्षणिक पुनर्वसनासाठी या आश्रमात दाखल करण्यात आले होते. तेथूनही तो बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने दिलेल्या खबरीवरून बºहाणपूर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. बºहाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रम येथून पळ काढल्यानंतर सहा महिन्यांनी त्याने मोबाइलवर संभाषण करून आईसोबत संपर्क साधला. त्या आधारावर त्याला विश्वासात घेऊन त्याचा पत्ता व संपर्क मिळवून मध्य प्रदेशातील बºहाणपूर (शिकारपुरा) पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी, श्रीराम गोकुळ आश्रमाचे प्रधान प्राचार्य सुरेश चौधरी आणि नीलेशची आई सुंदराबाई हे सोमवारी सकाळी ११ वाजता गोरखपूर पोहोचले. दुपारी बाराला पुरानी फुल मंडी परिसरात भंगार विक्रेत्याच्या दुकानात तो काम करताना आढळला.आश्रमातून पळालेला नीलेश गोरखपूर येथे पोहोचला. तेथे रेल्वे प्लॅटफार्मवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जमा करून भंगारात विकू लागला. आठवडाभरात त्याची मैत्री असेच भंगार जमा करणाऱ्या अजय नावाच्या मुलासोबत झाली. कधी भंगार विक्रेत्याच्या दुकानात तर कधी रेल्वेलाईन शेजारील अजयच्या झोपडीत तो झोपायचा.भंगार जमा करणाºया मुलांसोबत त्याची मैत्री जमली. गोरखपूर येथून जवळच नेपाळ हद्द असल्याने तो आपल्या सोबत्यांसोबत नेपाळ फिरून आला आणि तेथे कपडेही खरेदी केले, अशी माहिती खुद्द नीलेशने ‘लोकमत’सोबत बोलताना दिली.दरम्यान, रात्री उशिरा शिकरपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पवन देशमुख, सुनील सकवार आश्रमाचे प्रधानाचार्य सुरेश चौधरी, नीलेश व त्याची आई सुंदराबाई हे रेल्वेने घराकडे परत येत आहेत.बालशौर्य पुरस्कारनीलेश भिल ३० आॅगस्ट २०१५ रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरावर बॅकवॉटरवरील घाटावर बुडणाºया ११ वर्षीय मुलाचे प्राण वाचविल्याची दखल घेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालशौर्य २०१५ या पुरस्काराने त्याला सन्मानित केले होते. २६ जानेवारी २१०६ रोजी त्याला दिल्ली येथे समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
बालशौर्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश भिल गवसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:30 IST
बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे.
बालशौर्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश भिल गवसला
ठळक मुद्देनीलेशची नेपाळ यात्राभंगार जमा करायचा नीलेशबालशौर्य पुरस्काराबद्दल झाला होता सत्कार