जळगाव : राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल (रा. कोथळी ता. मुक्ताईनगर) हा दुस-यांदा बेपत्ता झाला आहे. यापूर्वी तो मुक्ताईनगर येथील आपल्या घरून बेपत्ता झाला होता. आता ब-हाणपूर (मध्य प्रदेश) येथील श्रीराम गोकुळ आश्रमाच्या खिडकीतून उडी मारुन पळाला आहे. मंगळवारी ही घटना घडली.नीलेश हा २०१७ मध्ये घरातून पळून गेला होता. परतल्यानंतर शैक्षणिक पुनर्वसनासाठी त्याला ब-हाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रमात दाखल करण्यात आले होते. आजोबाला भेटण्यासाठी जात असल्याचे निलेश याने आश्रमातील विद्यार्थ्यांना सांगितले होते. मंगळवारी पहाटे अंघोळ करण्यास जातो, असे सांगून सुरक्षारक्षकाची नजर चुकवून त्याने आश्रमातून पळ काढला. त्याच्या आईने दिलेल्या खबरीवरून पोलिसात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता नीलेश भिल दुसऱ्यांदा बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:03 IST