बुधवारपासून नशिराबाद टोलनाका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:31+5:302021-09-14T04:21:31+5:30

जळगाव : नशिराबादच्या काही अंतरावर असलेल्या सिमेंट फॅक्टरीजवळ टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावरून बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून टोलवसुलीला ...

Nasirabad Tolnaka starts from Wednesday | बुधवारपासून नशिराबाद टोलनाका सुरू

बुधवारपासून नशिराबाद टोलनाका सुरू

जळगाव : नशिराबादच्या काही अंतरावर असलेल्या सिमेंट फॅक्टरीजवळ टोलनाका उभारण्यात आला आहे. या टोलनाक्यावरून बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून टोलवसुलीला सुरुवात होणार असून यामुळे महामार्गाच्या वापरासाठी आता वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहे.

बुधवार, दि. १५ सप्टेंबरपासून टोलवसुली सुरू होणार असल्यामुळे कुठल्या वाहनासाठी किती दर आकारले जाईल, त्याबाबत नुकतेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दरांबद्दलची सार्वजनिक सूचना जारी केली आहे. त्यानुसार कार, प्रवासी व्हॅन, जीप, हलके मोटार वाहनाच्या एकेरी प्रवासाठी ८५ तर एका दिवसात परतीचा प्रवासाकरिता १३० रुपये आकारले जाणार आहे. त्याशिवाय हलके वाणिज्य वाहन, हलके मालवाहू वाहनाच्या एकेरी प्रवासासाठी १४० रुपये तर परतीच्या प्रवासाकरिता २१० रुपये़, ट्रक व बस एकेरी प्रवासाठी २९५ तर परतीच्या प्रवासाकरिता ४४०़, खोदकाम करणारी, माती वाहून नेणारे उपकरणे, जड बांधकाम यंत्रांच्या एकेरी प्रवासाठी ४६० व एका दिवसाच्या परतीचा प्रवासाकरिता ६९० रुपये आकारले जाणार आहे तर अवजड वाहनांना एकेरी प्रवासाठी ५६० रुपये मोजावे लागणार आहे.

सूटही केली जाहीर

सर्व वाहनांसाठी टोल तिकीट घेतल्यापासून २४ तासांसाठीचा परतीच्या प्रवासाठी २५ टक्के सूट देण्यात आली़ त्याचबरोबर सर्वप्रकारच्या वाहनासांठी टोलशुल्क भरल्याच्या तारखेपासून एका महिन्याकरिता ५० किंवा जास्त एकेरी प्रवास असल्यास त्यात ३३ टक्के सूट मिळणार आहे. टोलनाक्याच्या २० कि.मी. हद्दीतील अवाणिज्य वाहनांसाठी कॅलेंडर महिन्यासाठी स्थानिक पास हा २८५ रुपयांचा असेल.

Web Title: Nasirabad Tolnaka starts from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.