नशिराबादला वीज तारांच्या ठिणगीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:50+5:302021-03-04T04:29:50+5:30
नशिराबाद : येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या जवळच लोंबकळणाऱ्या वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने विजेची ठिणगी पडली, त्यात ...

नशिराबादला वीज तारांच्या ठिणगीने
नशिराबाद : येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या जवळच लोंबकळणाऱ्या वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने विजेची ठिणगी पडली, त्यात संजय रमेश मेहता यांच्या शेतात पाचपैकी दोन एकर चारा जळून खाक झाला. सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी घडली भादली रोडवर गावाच्या लगत शेत असल्यामुळे लागलीच नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी ललित महाजन, संजय नेहेते, मनोज पाटील, शेखर पाटील, जितेंद्र पाटील, कपिल पाटील आदींनी सहकार्य केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. शेतात गेले दोन दिवसापूर्वी धान्याची मळणी झाली होती चाऱ्याच्या पिंट्या भांडण यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहे. तलाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.