नाशिक येथील अपघातात जळगावच्या मायलेकीसह तीन ठार
By Admin | Updated: May 26, 2017 14:23 IST2017-05-26T14:23:38+5:302017-05-26T14:23:38+5:30
नाशिक येथील गडकरी चौकात शुक्रवार 26 रोजी पहाटे 5.15 वाजता झालेल्या भीषण अपघातात जळगाव येथील मायलेकीसह तीन महिला ठार झाल्या आहेत.
नाशिक येथील अपघातात जळगावच्या मायलेकीसह तीन ठार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.26- नाशिक येथील गडकरी चौकात शुक्रवार 26 रोजी पहाटे 5.15 वाजता झालेल्या भीषण अपघातात जळगाव येथील मायलेकीसह तीन महिला ठार झाल्या आहेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे.
नाशिक येथील गडकरी चौकात शुक्रवारी पहाटे 5.15 वाजता एमएच 01 एएल 7931 या कारने एमएच 15 डीसी 0527 या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात योगिनी लीलाधर भामरे (19), सरिता लीलाधर भामरे (35 मूळ रा.जळगाव) या मायलेकीसह रेखा प्रकाश पाटील (33, रा.मुंबई) या तिघांचा मृत्यू झाला. तर लीलाधर भामरे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य राबवित जखमी लीलाधर भामरे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती आमच्या नाशिक प्रतिनिधीने कळविली आहे.