Narayan Patil unopposed as Chairman of Chopda Agricultural Income Market Committee | चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नारायण पाटील बिनविरोध

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नारायण पाटील बिनविरोध

चोपडा, जि.जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नारायण शालिग्राम पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अलिखित करारानुसार अध्यक्ष जगन्नाथ दामू पाटील यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ३१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत ही बिनविरोध करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक उप निबंधक के. पी. पाटील यांनी काम पाहिले. सकाळी ११ वाजता निवड प्रक्रियेस सुरूवात झाली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत साडेअकरापर्यंत होती. यात सभापती पदासाठी एकमेव नारायण शालिग्राम पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले होते. नंतर त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक उपनिबंधक के. पी. पाटील यांनी बाजार समिती सभागृहात जाहीर केले. सभापती पदासाठी नारायण पाटील यांना सूचक कांतीलाल गणपत पाटील तर अनुमोदक म्हणून दिनकर पंडितराव देशमुख हे होते. निवडीनंतर सभापती नारायण पाटील यांचा सत्कार माजी आमदार दिलीप सोनवणे, चोसाका माजी चेअरमन अ‍ॅड. घनश्याम पाटील, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, उपसभापती नंदकिशोर पाटील यांनी केला.
निवड प्रक्रिया प्रसंगी उपसभापती नंदकिशोर पाटील, संचालक गोपाळ पाटील, प्रल्हाद पाटील, संगीता पाटील, मनीषा सोनवणे, रामलाल कंखरे, नितीन पाटील उपस्थित होते
अनुपस्थित संचालक- सभापती निवडीच्या वेळेस संचालक धनंजय पाटील, अरुण भगवान पाटील, भरत बापूराव पाटील, मुरलीधर लहू बाविस्कर, सुनील जैन, घनश्याम अग्रवाल हे अनुपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामी निर्णय अधिकारी पाटील यांना महाले व बाजार समितीचे सचिव नीळकंठ सोनवणे यांनी सहकार्य केले.

Web Title: Narayan Patil unopposed as Chairman of Chopda Agricultural Income Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.