हरितक्रांतीसाठी नपा कर्मचाऱ्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:24 IST2020-07-19T16:24:10+5:302020-07-19T16:24:19+5:30
चाळीसगाव करणार हिरवेगार : विविध वृक्षारोपण मोहीम घेतली हाती

हरितक्रांतीसाठी नपा कर्मचाऱ्यांचा पुढाकार
चाळीसगाव : हरीतक्रांतीसाठी चाळीसगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला असून शहरालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या परीसरात 'ग्रीन मिशन' मोहिमेस सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत चाळीसगाव नगरपरिषद कर्मचाºयांच्या वतीने परीसरात निंब, वड आदी रोपांचे रोपण करण्यात आले.
लोकांच्या मनात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी, पर्यावरणाचा ºहास थांबावा या उद्देशाने नगरपरिषद कर्मचाºयांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.
यावेळी पाणीपुरवठा अभियंता संजय अहिरे ,वरिष्ठ लिपिक दिनेश जाधव यांनी विचार व्यक्त केले. अभियंता संजय अहिरे, दिनेश जाधव, भूषण लाटे, प्रेमसिंग राजपूत, नितीन सुर्यवंशी, सुमित सोनवणे, मनोज पगारे, वाल्मिक सोनवणे, दिलीप पाटील, राजू जाधव, नितीन शिरसाठ, सोपान पाटील, अनिल चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.