शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

नंदुरबारातील शंभर खेड्यांचा ‘सिलेज’ने करणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:09 PM

विद्यापीठाला १३ कोटी ९५ लाखांचा निधी

जळगाव : विज्ञान -तंत्रज्ञानावर आधारीत खेड्यांचा विकास करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने ‘सिलेज’ (सीटी लाईक व्हीलेजेस) हा प्रकल्प हाती घेतला आहे़ यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने मुंबई यांनी १३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. नंदुरबारातील शंभर खेड्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे़ कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या २५ एकर जागेत नंदुरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकार होत आहे़ आदिवासी, ग्रामीण आणि शहरी शिक्षण व ज्ञानाचा एकत्रित सायबर मंच व विद्यापीठातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे स्थापित करण्यात येणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे , कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील विद्यापीठाच्या या सिलेज आधारित प्रकल्पास सहकार्य करणार आहेत असे कुलगुरू प्रा.पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर हा दुसरा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे ते म्हणाल़ेशहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील १०० गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार असून या मध्ये सौरउर्जा, शुध्द पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन तंत्रज्ञान, जौविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असेल.आदिवासी समुहातील नवउद्योजक घडविण्यासाठी ैविज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र नंदुरबार येथे स्थापित केले जाणार आहे.या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बहिस्थ शिक्षण व अध्ययन विभागाच्या वतीने सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. प्रकल्पाचे मुख्य समन्वयक प्रा. एस.टी. बेंद्रे, कार्यक्रम समन्वयक व आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. ए.बी. चौधरी, उपसमन्वयक प्रा. एच.एल. तिडके, प्रा.के.एस. विश्वकर्मा, प्रा.जे.पी.बंगे, प्रा.बी.एल.चौधरी, प्रा.एस.टी. इंगळे व प्रा. एस.एन.पाटील उपस्थित होते.२४ कोटींचा निधी अपेक्षितसिलेज प्रकल्पासाठी सुमारे २४ ते २५ कोटींचा निधी अपेक्षित आहे़ पहिल्या टप्प्यातील निधीला मंजुरी मिळाली असून उर्वरित निधीही लवकरच मंजूर होईल, असे यावेळी सांगण्यात आले़ नंदुरबारातील ज्या गावांमध्ये विकासच पोहचलेला नाही, त्या गावांच्या अनुभवानुसार प्राधान्याने निवड करण्यात आली आहे़ या प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांच्या कल्पकतेला महत्त्व देऊन त्यांना संधी दिली जाणार आहे़ पंढरपुरातही हा प्रकल्प राबविला गेल्याचे राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी सांगितले ़ शंभरपैकी ३५ खेडी निश्चित झाल्याची माहितीही त्यांनी दिली़

टॅग्स :Jalgaonजळगाव