स्व.अनिल बोरोले चौकाचे नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:17 IST2021-03-10T04:17:25+5:302021-03-10T04:17:25+5:30
जळगाव : जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष स्व. अनिल बोरोले यांचा १३ जुलै ...

स्व.अनिल बोरोले चौकाचे नामकरण
जळगाव : जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष स्व. अनिल बोरोले यांचा १३ जुलै २०१९ रोजी रस्ते अपघातात झाला. त्यांच्या कामाची आठवण राहावी, म्हणून चित्रा चौक आणि बेंडाळे चौक यामध्ये असलेल्या चौकाचे नामकरण स्व. अनिल बोरोले चौक असे करण्यात आले आहे. या चौकाच्या नामफलकाचे अनावरण ९ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता उपमहापौर सुनील खडके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, नीळकंठ खडके, शीतल अनिल बोरोले, अशोक बोरोले, पांडुरंग बोरोले, डॉ. धनंजय बोरोले, भास्कर बोरोले, निरंजन बोरोले, योगेंद्र बोरोले, योगिनी नेहेते, आदिती नेहेते, दगडू ढाके, आशा ढाके उपस्थित होत्या.