शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

४१४ टवाळखोरांवर ‘निर्भया’चा दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:50 IST

सुनील पाटील । जळगाव : शाळा, महाविद्यालय व उद्यानांमध्ये महिला, विद्यार्थिनी व तरुणींची छेडखानी करणाऱ्या शहरातील ४१४ टवाळखोरांवर पोलिसांच्या ...

सुनील पाटील ।जळगाव : शाळा, महाविद्यालय व उद्यानांमध्ये महिला, विद्यार्थिनी व तरुणींची छेडखानी करणाऱ्या शहरातील ४१४ टवाळखोरांवर पोलिसांच्या ‘निर्भया’ पथकाने कारवाईची दंडूका उगारला असून काही प्रकरणांमध्ये थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, महिला व तरुणींच्या दिमतीला सरकारने पोलीस दलाच्या माध्यमातून ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली आहे. हे पथक शाळा, महाविद्यालय असो कि उद्याने व इतर गर्दीच्या ठिकाणी छेडखानी करणाºया टवाळखोरांवर ‘वॉच ठेवून असते.जळगाव शहरात निर्भयाची स्थापना केल्यानंतर यंदापासून भुसावळ व फैजपूर या भागातही पोलीस दलातर्फे निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेम असो विकृतीतून छेडखानी या घटनांना आळा बसावा यासाठीच निर्भया पथक जिल्ह्यात काम करीत आहेत.सामाजिक बांधिलकीचीही जाणनिर्भया पथकाने टवाळखोरांवर कारवाई करताना आपल्या पाल्याचे कर्तृत्व काय आहे, याची माहिती व्हावी यासाठी त्यांच्या आई, वडीलांनाच घटनास्थळावर पाचारण केले आहे. शालेय जीवन व भविष्य पाहता गुन्हे दाखल न करता प्रतिबंधात्मक कारवाई, समज, चारचौघात प्रसाद व मुलींची माफी मागून त्यांना सोडून देण्यात आले आहे. एकंदरीत या पथकामुळे टवाळखोरांवर निश्चित आळा बसला असून यात सातत्य ठेवणे अपेक्षित असल्याचे मत महिला वकील मंजुळा मुंदडा यांनी व्यक्त केले आहे.नियंत्रण कक्षातून मिळू शकते तात्काळ मदतशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह तरुणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया व दामिनी पथक तयार करण्यात आले असून महिला व मुलींना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणून जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष ०२५७-२२२३३३३, १००, मोबाइल क्र.९८६०५०१०९१ व व्हाट्सअ‍ॅप क्रमांक ९४२२२१०७०१ नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत विशेष म्हणजे ही सुविधा २४ तास आहे. महिला पोलिसांच्या निर्भया पथकात महिला हवालदार मंजुळा तिवारी, उषा सोनवणे, सहायक फौजदार अभिमन्यू इंगळे व अनिल तायडे यांचा समावेश असून हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत तत्पर असते.का आणि केव्हा झाली ‘निर्भया’ची स्थापना१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील भौतिकोपचार शिकणाºया विद्यार्थिनीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला केला व नंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीचे उपचार करण्यासाठी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून सिंगापूरला हलविण्यात आले होते. तेथे रुग्णालयात १३ दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेतील पीडितेला निर्भया हे नाव देण्यात आले होते. तेव्हापासून महिला, तरुणी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात निर्भया याच नावाने स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले. महाराष्टÑात एकाचवेळी जिल्हास्तरावर या पथकाची स्थापना करुन स्वतंत्र ‘निर्भया’ वाहन या पथकाला देण्यात आले.छेडखानी किंवा आक्षेपार्ह प्रकार घडत असेल तर महिला, विद्यार्थिनी व तरुणींनी बिनधास्तपणे ‘निर्भया’ पथकाशी संपर्क साधावा. जनतेने देखील आपल्या डोळ्यासमोर प्रकार घडत असेल तर सजग राहून पोलिसांना माहिती द्यावी. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत निर्भया पथक संपूर्ण शहरात फिरत असते. घटनेची माहिती मिळताच पाच ते दहा मिनिटात आम्ही घटनास्थळावर पोहचतो. आठ वर्षात ४१४ टवाळखोरांवर कारवाई केली आहे.-उषा सोनवणे, निर्भया पथक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव