नगरदेवळा ग्रा. पं. बैठकीत शाळा सुरू करण्याचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:25+5:302021-07-15T04:13:25+5:30
दि. १४ जुलै रोजी ग्रामसचिवालयात सरपंच प्रतीक्षा किरण काटकर यांच्या अध्यक्षतेखाली आठवी ते बारावीपर्य़ंतचे वर्ग सुरू करण्यात यावेत, यासाठी ...

नगरदेवळा ग्रा. पं. बैठकीत शाळा सुरू करण्याचा ठराव मंजूर
दि. १४ जुलै रोजी ग्रामसचिवालयात सरपंच प्रतीक्षा किरण काटकर यांच्या अध्यक्षतेखाली आठवी ते बारावीपर्य़ंतचे वर्ग सुरू करण्यात यावेत, यासाठी ग्रामस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. त्यात शाळा सुरू करण्याअगोदर सोडियम हायक्लोराइडने सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करावे, सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून शालेय व्यवस्थापनाने शासनाच्या निर्देशानुसार मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करूनच आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात यावेत, असा ठराव ग्रामस्तरीय समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
यावेळी बैठकीस केंद्रप्रमुख चंद्रकात मोराणकर, एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य व्ही. बी. बोरसे, ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सी. टी. शेलार, ग्रामविकास अधिकारी संतोष शिवणेकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ. वीरेंद्र पाटील, तलाठी आर. सपकाळ उपस्थित होते.