Nag Chorana has been imprisoned for one year in the Maroti temple in Jalgaon | जळगावात मारोती मंदिरातील नाग चोरणा-याला एक वर्ष कारावास
जळगावात मारोती मंदिरातील नाग चोरणा-याला एक वर्ष कारावास

ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकालसहा महिन्यातच निकालअंडरट्रायल चालला खटला

जळगाव : बळीराम पेठेतील मंदिरातून तांब्याचा नाग चोरी केल्याच्या प्रकरणात सुरेश बाबुराव पवार (६३, रा.पुणे) याला न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयाने एक वर्ष कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहा महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. गुन्हा घडल्यापासून आरोपी कारागृहात होता. 
६ जानेवारी २०१९ रोजी बळीराम पेठेतील रुद्रलाल मारोती मंदिरात तांब्याचा नाग चोरी झाला होता. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. सुरेश मोतीलाल दिवेकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी सुनील पाटील, विजयसिंग पाटील व रतन गिते यांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली होती. न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला अंडरट्रायल चालला. सरकारतर्फे अ‍ॅड.आर.पी.गावीत यांनी काम पाहिले.


Web Title: Nag Chorana has been imprisoned for one year in the Maroti temple in Jalgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.