बोदवड, जि.जळगाव : प्रात:र्विधीस जाणाऱ्या अरुण सीताराम अवचारे (वय ३८) या तरुणास रिक्षाने उडविल्याची घटना तालुक्यातील नाडगाव येथे रविवारी सकाळी आठला घडली. त्याचा जागीच मृत्यू झाला.नाडगाव येथील अरुण अवचारे हा तरुण सकाळी प्रात:र्विधीसाठी बोदवड रस्त्याने जात होता. तेव्हा बोदवडहून मुक्ताईनगरकडे जाणाºया एमएच-१९-बीएम-०८९२ या क्रमांकाच्या भरधाव तीन चाकी रिक्षाची या तरुणास जबर धडक बसली. त्यात तो जागीच ठार झाला. या तरुणास रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.या तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहे. हा तरुण हा मोलमजुरी करून मुलांच्या शिक्षणाचा गाडा हाकत होता. या तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे तरुणास रिक्षाने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 16:42 IST
प्रात:र्विधीस जाणाऱ्या अरुण सीताराम अवचारे (वय ३८) या तरुणास रिक्षाने उडविल्याची घटना तालुक्यातील नाडगाव येथे रविवारी सकाळी आठला घडली.
बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे तरुणास रिक्षाने उडविले
ठळक मुद्देप्रात:र्विधीला जात असतानाची घटनामृत्यूने परिसरात हळहळ