एन. के. नारखेडे शाळेत ऑनलाईन बँकिंग सेमिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:29+5:302021-09-23T04:19:29+5:30

युनियन बँकेचे माजी मॅनेजर राघवेंद्र सिंग यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षिकांना बँकेचे व्यवहार कसे चालतात, कोणकोणत्या पद्धतीने आपण पैसे ...

N. K. Online Banking Seminar at Narkhede School | एन. के. नारखेडे शाळेत ऑनलाईन बँकिंग सेमिनार

एन. के. नारखेडे शाळेत ऑनलाईन बँकिंग सेमिनार

युनियन बँकेचे माजी मॅनेजर राघवेंद्र सिंग यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षिकांना बँकेचे व्यवहार कसे चालतात, कोणकोणत्या पद्धतीने आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो, जसे आरटीजीएस, एनईएफटी तसेच विद्यार्थ्यांनी बचत खाते कसे उघडावे, डीडी तसेच धनादेशमध्ये काय फरक आहे, ऑनलाइन खाते कसे सुरू करावे, ऑनलाइन खाते ओपन करण्यास पॅन कार्ड नंबर आवश्यक आहे.

रिक्यूरिंग डिपॉझिट फॉर्म कसे भरावे अशी उपयुक्त माहिती सोप्या भाषेत समजून सांगितली. काही विद्यार्थ्यांनी प्रश्नही विचारले. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षिका मिळून २०० जण सहभागी झाले होते.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास एन. नारखेडे, संस्थेचे चेअरमन पी. व्ही. पाटील, सेक्रेटरी डॉ. मकरंद एन. नारखेडे यांनी शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन गजाला बासित यांनी, आभार शबनम तडवी यांनी मानले. ऑनलाईनसाठी योगिता नारखेडे यांनी सहकार्य केले.

Web Title: N. K. Online Banking Seminar at Narkhede School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.