शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

भादली हत्येचे गूढ महिनाभरानंतर कायमच

By admin | Updated: April 20, 2017 01:16 IST

पोलीस हतबल : ठोस पुराव्यासाठी आता ‘नार्को टेस्ट’

नशिराबाद : भादली बु. येथे भोळे कुटुंबाची अमानुष हत्याकांडाची घटना होवून आज गुरुवारी महिना होत आहे तरी पोलिसांंना खुनाचे रहस्य अद्याप उलगडले नाही.  संशयीत आरोपीही गवसलेले नाही. खुनाचे कोडे उगडत नसल्याने पोलीस हतबल झाले आहेत.पोलिसांनी चौफेर तपास, नातलगांसह अनेकांची चौकशी करुनही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही, जनतेच्या सहकार्याअभावी खुनाचा तपास लागण्यात अडचण येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.भादली बुद्रुक येथील भोळेवाड्यात मध्यरात्रीच्या सुमारास प्रदीप सुरेश भोळे, त्यांची पत्नी संगीता यांच्यासह मुलगी दिव्या व मुलगा चेतन यांची तीक्ष्ण हत्याराने अज्ञात हल्लेखोरांनी २० मार्च रोजी अमानुष हत्या केली. भोळे कुटुंबाच वंश नामशेष केला. या घटनेमुळे भादलीसह संपूर्ण जिल्हा हादरला व शोक व्यक्त केला. घटनेनंतर पोलिसांनी तपासचक्रे जलदगतीने फिरवले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस  अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस एक करुन तपास केला , मात्र आज महिना होवूनही आरोपी शोधण्यात पोलिसांना आव्हान कायमच आहे.  ५० हजाराचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले मात्र त्यासही प्रतिसाद मिळाला नाही. घटनेचे रहस्य उलगडण्यासाठी जनतेने समोर यावे, पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी निलोत्पल यांनी केले आहे. आतापर्यंत हत्याकांडाबाबत चौफेर तपास करण्यात आला. मात्र ठोस पुरावा व जनतेच्या सहकार्याअभावी तपासात अडचणी आहे, असेही ते म्हणाले.भादली हत्याकांड प्रकरणात सर्वांगाने तपास केला आहे. त्यात पुरेशी माहिती मिळाली आहे. ठोस पुराव्यासाठी काही जणांची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा गुन्हा उघडकीस येईल अशी खात्री आहे.-डॉ.जालिंदर सुपेकर,                      पोलीस अधीक्षकया गुन्ह्यात काही पुरावे मिळाले आहेत. येत्या तीन ते चार दिवसात यात आणखी प्रगती होवू शकते. -मोक्षदा पाटील,                             अपर पोलीस अधीक्षक