आईशी फोनवर बोलायला गेला अन् लॅपटॉप चोरीला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:46+5:302021-03-28T04:15:46+5:30

जळगाव : खोलीच्या बाहेर जाऊन आईशी फोनवर बोलत असतानाच पवन काळूसिंग पाटील (२०) या तरुणाचा आतमध्ये चार्जिंगला लावलेला ...

My mother went to talk on the phone and the laptop was stolen | आईशी फोनवर बोलायला गेला अन् लॅपटॉप चोरीला गेला

आईशी फोनवर बोलायला गेला अन् लॅपटॉप चोरीला गेला

जळगाव : खोलीच्या बाहेर जाऊन आईशी फोनवर बोलत असतानाच पवन काळूसिंग पाटील (२०) या तरुणाचा आतमध्ये चार्जिंगला लावलेला लॅपटॉप लंपास केल्याची घटना २१ मार्च रोजी रामदास कॉलनीत घडली. या प्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पवन हा शिक्षण घेत असून तो रामदास कॉलनी मध्ये रूम वर भाड्याने राहतो. २१ मार्चला रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पवनला आईचा फोन आला. तो आईसोबत बोलण्यासाठी रूमचा दरवाजा ढकलून तो बाहेर गेला. रूमचा दरवाजा उघडा लक्षात आल्याने त्याने मित्र रोशन याला फोन करून रूम मध्ये लॅपटॉप चार्जिंगला लावला आहे तिकडे लक्ष असू दे सांगितले. रोशनने बघितले असता लॅपटॉप दिसून आला नाही. तपास उषा सोनवणे करीत आहे.

Web Title: My mother went to talk on the phone and the laptop was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.