तांबापूरा येथे माय-लेकीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:15 IST2021-03-07T04:15:40+5:302021-03-07T04:15:40+5:30

जळगाव : टेपचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून माय-लेकीला चौघांनी लाकडी बॅट मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तांबापुरा ...

My-Leki beaten at Tambapura | तांबापूरा येथे माय-लेकीला मारहाण

तांबापूरा येथे माय-लेकीला मारहाण

जळगाव : टेपचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून माय-लेकीला चौघांनी लाकडी बॅट मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तांबापुरा भागात घडली. सिंधूबाई याहीरे व माया याहीरे असे जखमी माय-लेकीचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबापूरा येथे सिंधूबाई दत्तू याहीरे ह्या मुलगी माया हिच्यासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजता शेजारी राहणारे करण दीपक अहिरे यांनी टेपचा आवाज मोठा केला होता. तो आवाज कमी करण्यासाठी माया याहिरे यांनी सांगितले. याचा राग आल्याने करण अहिरे, अलका अशोक शिरसाठ, लक्ष्मण भावळू साळवे आणि छाया लक्ष्मण साळवे यांनी दोघांना चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. प्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नितीन पाटील करीत आहे.

Web Title: My-Leki beaten at Tambapura