मविप्र आमच्या ताब्यातच - नीलेश भोईटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:56+5:302021-03-27T04:16:56+5:30
जळगाव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्था सध्या आमच्या ताब्यात आहे आणि मी संस्थेचा मानद सचिव आहे. नाशिकच्या धर्मदाय ...

मविप्र आमच्या ताब्यातच - नीलेश भोईटे
जळगाव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्था सध्या आमच्या ताब्यात आहे आणि मी संस्थेचा मानद सचिव आहे. नाशिकच्या धर्मदाय सहआयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, सहकारी कायद्यानुसार निवडून आलेल्या गटाला सध्या संस्थेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. याच आदेशानुसार ही संस्था पोलीस नियंत्रणात चालवत आहोत, असे संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी सांगितले.
संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ ॲड. विजय पाटील हे लावत आहे. अजून सविस्तर निकालाची प्रत आमच्याकडे आलेली नाही. मात्र, या निकालानुसार तहसीलदारांनी जो आदेश दिला होता, तो आदेश पुन्हा एकदा तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले की, ‘या आधी जो वाद झाला होता, त्याबाबत आम्हीही तक्रार केली होती. पाटील यांचे संचालक मंडळ हे सहकार कायद्यानुसार निवडून आलेले आहे. मात्र, ते संस्थेच्या मालमत्तेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे संस्थेला पोलीस संरक्षण देण्याचा निर्णयही डिसेंबरमध्येच धर्मदाय सहआयुक्तांनी दिला आहे. मात्र, अद्याप जिल्हा न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळालेली नसल्याने, याबाबत सविस्तर बोलणे योग्य होणार नाही.’