पोलीस प्रशासनातर्फे स्वखर्चाने टाकला मुरूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:23+5:302021-07-29T04:16:23+5:30
याशिवाय शहर पोलीस ठाण्यापासून तर पुढे वसंत टॉकीज चौक पर्यंत संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे पालिका प्रशासनाचे ...

पोलीस प्रशासनातर्फे स्वखर्चाने टाकला मुरूम
याशिवाय शहर पोलीस ठाण्यापासून तर पुढे वसंत टॉकीज चौक पर्यंत संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मात्र दररोजचा वापर असल्यामुळे शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. पालिका प्रशासनाच्या रस्ते दुरुस्तीची वाट न पाहता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी आशा तडवी व सहकाऱ्यांनी खड्ड्यांपासून मुक्ती मिळावी याकरिता स्वखर्चाने मुरूम टाकले.
दरम्यान यापेक्षाही जास्त विदारक परिस्थिती जामनेर रोडवर शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोरील तर थेट अमर स्टोअरपर्यंतच्या रस्त्यापर्यंत खोल खड्डे आहेत. येथेही पालिका प्रशासनाने त्वरित गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.