पाहुण्या दाम्पत्याच्या भांडणात महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:02+5:302020-12-04T04:44:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नातेवाइकाकडे पाहुणे म्हणून आलेल्या दाम्पत्याचा वाद सोडविण्यासाठी मदत करणाऱ्या यजमान महिलेच्या डोक्यात लाकडी थापी ...

पाहुण्या दाम्पत्याच्या भांडणात महिलेचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नातेवाइकाकडे पाहुणे म्हणून आलेल्या दाम्पत्याचा वाद सोडविण्यासाठी मदत करणाऱ्या यजमान महिलेच्या डोक्यात लाकडी थापी घालून खून केल्याची घटना तालुक्यातील शिरुड दिगर येथे बुधवारी पहाटे घडली. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कोकिलाबाई मुरसिंग भील (५२) रा.शिरुड दिगर असे मयत महिलेचे नाव आहे, तर श्रीराम काल्या शेवाळे असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, श्रीराम काल्या शेवाळे व त्याची पत्नी सिंधू हे त्यांचे नातेवाईक मुरसिंग तिरसिंग भील यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. १ डिसेंबरच्या रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मध्यरात्रीच्या सुमारास कडाक्याच्या भांडणात झाले.
बुधवारी (दि. २) पहाटे ५ वाजेच्या सुमारास हे भांडण सोडविण्यासाठी कोकीलाबाई गेल्या असता रागाच्या भरात श्रीराम शेवाळे याने तिच्या डोक्यात लाकडी थापी माररून गंभीर जखमी केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने कोकिलाबाई ही जागीच गतप्राण झाली.
प्रभारी पोलीस निरीक्षक एम. रमेश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुरसिंग तिरसिंग भील याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.