भुसावळमध्ये खूनाचे सत्र, दसर्याच्या रात्री एकाचा खून
By चुडामण.बोरसे | Updated: October 25, 2023 11:08 IST2023-10-25T11:06:19+5:302023-10-25T11:08:21+5:30
यामुळे भुसावळ शहर एकदा हादरले आहे.

भुसावळमध्ये खूनाचे सत्र, दसर्याच्या रात्री एकाचा खून
वासेफ पटेल
भुसावळ (जि.जळगाव) : एकीकडे दसर्याचा उत्साह सुरू असतांना मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास शहरात पुन्हा एकाचा खून झाला. यामुळे भुसावळ शहर एकदा हादरले आहे. दिलीप जोनवाल ( वय ४९, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ ) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
रात्री एक वाजेच्या सुमारास शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाजवळ दिलीप जोनवाल याच्यावर अज्ञात मारेकर्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
गेल्या महिन्यात भुसावळात चार खून झाले होते. यात गुन्हेगार निखील राजपूत याच्यासह कंडारी येथील तिघांचा समावेश होता. यानंतर खडका रोड परिसरात एकाचा खून झाला होता. या पाठोपाठ आता शहरातील मध्यवर्ती परिसरात जोनवाल याचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.