अमळनेर शहरात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 10:35 AM2021-01-01T10:35:39+5:302021-01-01T10:35:52+5:30

अमळनेर : आधी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी रात्री आठ वाजेच्या ...

Murder of one in Amalner town | अमळनेर शहरात एकाचा खून

अमळनेर शहरात एकाचा खून

Next


अमळनेर : आधी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनीत घडली.
३१ रोजी संध्याकाळी पाच वाजता शीतल मुकेश सैंदाणॆ व कमल मुनिर फथरोड यांच्यात भांडण सुरू होते. एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी राजेश सिद्धी जाधव यांनी हे भांडण पाहिले. मात्र किरकोळ भांडण असल्याने मिटून जाईल म्हणून त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाणे, मुकेश गोकुळ सैंदाणेव भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी कमल फथरोड याला बोलावून घेतले आणि सायंकाळच्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्याकाठ्यानी कमलच्या छातीवर, डोक्यावर, कपाळावर व हातावर मारहाण केली. त्यात रक्त सांडून कमल रस्त्यावर पडलेला होता. कमलचा मृत्यू झालेला होता. घटनास्थळी शीतलच्या हातातील बांगड्या फुटून पडलेल्या होत्या.
म्हाडा कॉलनी टाकरखेडा रस्त्यावर शहराबाहेर चार कि.मी. अंतरावर असल्याने खून होऊन दोन तास उलटले तरी याबाबत भीतीने कोणीही वाच्यता करायला तयार नव्हते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाल्यावर डीवाय.एस.पी. राकेश जाधव, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शीतल, मुकेश व भाग्यश्री उर्फ भुरी यांचा शोध घेतला असता ते तिघे फरार झाल्याचे समजले. तिघांनी पातोंडा येथे एका ठिकाणी आश्रय घेतल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथून तिघांना अटक केली. तिघांविरुद्ध खुनाचा व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवाय.एस.पी. राकेश जाधव करीत आहेत.
कमल पथरोड याच्यावर हाणामाऱ्या, शरीरावर वार करणे अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल असून, त्याला एका खुनाच्या गुन्ह्यात १४ वर्षे शिक्षा झाली होती. कालदेखील त्याने शीतल सैंदाणे या महिलेस बरे वाईट बोलण्याने त्यांच्यात भांडण होऊन खून झाल्याची चर्चा आहे.

Web Title: Murder of one in Amalner town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.