डोक्यात लाकडी दांडा मारुन सावत्र आईचा खून; चोपडा येथील घटना

By चुडामण.बोरसे | Published: September 26, 2022 06:46 PM2022-09-26T18:46:05+5:302022-09-26T18:47:07+5:30

सावत्र आईकडून नीट वागणूक मिळत नसल्याने संतापलेल्या मुलाने तीच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केला.

murder of stepmother by hitting her head with a wooden stick incident at Chopra | डोक्यात लाकडी दांडा मारुन सावत्र आईचा खून; चोपडा येथील घटना

डोक्यात लाकडी दांडा मारुन सावत्र आईचा खून; चोपडा येथील घटना

googlenewsNext

चोपडा, जि. जळगाव : सावत्र आईकडून नीट वागणूक मिळत नसल्याने संतापलेल्या मुलाने तीच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केला. ही  घटना गलंगी ता. चोपडा येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. सावत्र मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. 

सहाबाई शिवराम बारेला (४५) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मगन वेचान पावरा (५५) याची पहिली पत्नी कमलबाई  पावरा (५०) हिने एक वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला दोन मुले  व मुलगी आहे. तीनही जणांची लग्ने झाली आहेत. मगन याने काही दिवसांपूर्वीच सहाबाईला घरी आणले होते. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर पावरा परिवारात भांडण झाले. सहाबाई ही व्यवस्थित वागणूक देत नव्हती.  या प्रकाराला सावत्र मुलगा दीपक मगन बारेला (२५) हा वैतागला होता. रविवारी रात्री याच कारणावरुन वाद झाला आणि दीपक याने सावत्र आई सहाबाई हिच्या डोक्यात लाकडी दांडा मारला, त्यातच तिचा मृत्यू झाला.

माहिती मिळताच चोपडा पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय वसावे, भरत नाईक, सुनील कोळी, राजू महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली.  जागेवरच पंचनामा करण्यात आला.  गलंगी येथील पोलीस पाटील चारुलता देवराज यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Web Title: murder of stepmother by hitting her head with a wooden stick incident at Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.