नांदण्यास येत नसल्याने पतीने केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 11:05 IST2020-06-16T10:45:38+5:302020-06-16T11:05:51+5:30
नांदण्यास येत नसल्यामुळे पतीने पत्नीला ठार केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली.

नांदण्यास येत नसल्याने पतीने केला पत्नीचा खून
चाळीसगाव, जि.जळगाव : पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीने तिचे माहेर गाठत तिचा खून केला. ही घटना चाळीसगाव शहरापासून तीन कि.मी. अंतरावर असणा-या करगाव तांडा क्रमांक चारमध्ये मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता घडली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मयत कविता युवराज जाधव (वय ४२) ही विवाहिता करगाव तांडा क्रमांक चारमध्ये राहत होती. पिंपरखेड (ता.चाळीसगाव) येथील तिचा पती युवराज कपूरचंद जाधव याने मंगळवारी करगाव येथे येऊन धारदार शस्त्राने तिचा खून केला. विवाहिता त्याच्यासोबात पिंपरखेड येथे नांदावयास जात नव्हती. असे कारण सांगितले जात आहे. तपास पीएस अभिजीत पांडे हे करीत आहे.