पाच जणांच्या खुनाची घटना ताजी असताना भुसावळात पुन्हा गावठी कट्टा, जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:20 PM2019-10-09T12:20:23+5:302019-10-09T12:20:52+5:30

आरोपीस अटक

The murder case of five persons was recovered while the mules were recovered in Bhusawal. | पाच जणांच्या खुनाची घटना ताजी असताना भुसावळात पुन्हा गावठी कट्टा, जिवंत काडतूस जप्त

पाच जणांच्या खुनाची घटना ताजी असताना भुसावळात पुन्हा गावठी कट्टा, जिवंत काडतूस जप्त

googlenewsNext

भुसावळ, जि. जळगाव : भुसावळ येथे झालेल्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच मंगळवारी शहरात पुन्हा गावठी कट्टा, जिवंत काडतूस आढळून आले असून ते घेऊन फिरणाऱ्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
शहरातील समता नगर व आरपीडी रोडवर रविवारी गावठी कट्टा त्याचप्रमाणे चॉपरचा वापर करून पाच जणांचा खून करण्यात आला होता. हे हत्याकांड घडण्यापूर्वी शहरात सलग दोन दिवस गावठी कट्टे ताब्यात घेऊन चार लोकांना अटक करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले याच्या आदेशावरुन बाजारपेठ पो .स्टे .हद्दीत कोबिंग आॅपरेशन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून आरोपी रमाकांत वेडू वाघ (४२, रा.महात्मा फुले नगर ) हा पहाटे साडेतीन वाजता भुसावळ शहरात नाहाटा चौफुली भागात पाण्याच्या टाकी जवळ आढळून आला. त्याच्याजवळ विना परवाना गावटी कट्टा व जिवंत काडतूस आढळून आले.

Web Title: The murder case of five persons was recovered while the mules were recovered in Bhusawal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव