मनपा स्थायीची आज सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:16 IST2021-03-08T04:16:31+5:302021-03-08T04:16:31+5:30

जळगाव- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावरील उपाययोजना करण्यासाठी स्थायी समितीच्या विशेष सभेचे आयोजन सोमवारी सकाळी ११ वाजता ...

Municipal Standing Committee meeting today | मनपा स्थायीची आज सभा

मनपा स्थायीची आज सभा

जळगाव- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावरील उपाययोजना करण्यासाठी स्थायी समितीच्या विशेष सभेचे आयोजन सोमवारी सकाळी ११ वाजता सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरमधील उपाययोजनांसाठी काही कामांना मंजुरी या सभेत देण्यात येणार आहे.

भजे गल्लीमधील अतिक्रमण काढण्याची मागणी

जळगाव- शहरातील भजे गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून या ठिकाणी अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे; मात्र काही दिवसातच या ठिकाणी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे.

महिला दिनानिमित्त व्याख्यान

जळगाव- जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून सायंकाळी सहा वाजता ‘महिला विकासाच्या दिशा’ या विषयावरील सोनाल चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मनपा आरोग्य समितीची आज बैठक

जळगाव- मनपा आरोग्य समितीच्या बैठकीचे आयोजन सोमवारी दुपारी चार वाजता सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात करण्यात आले आहे. या बैठकीत शहराच्या दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटर ग्रेस कंपनी व मनपा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे.

Web Title: Municipal Standing Committee meeting today