मनपा कर्मचारीच विनामास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST2021-04-01T04:17:21+5:302021-04-01T04:17:21+5:30

जळगाव : गणेश कॉलनी भागात बुधवारी सकाळी साफसफाईला आलेले कर्मचारी हे विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले. गेल्या तीन ते ...

Municipal employees without masks | मनपा कर्मचारीच विनामास्क

मनपा कर्मचारीच विनामास्क

जळगाव : गणेश कॉलनी भागात बुधवारी सकाळी साफसफाईला आलेले कर्मचारी हे विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हे कर्मचारी गटारे साफ करणे, रस्ते झाडणे या कामांसाठी आले नव्हते. बुधवारी सकाळी आल्यावरही या कर्मचाऱ्यांनी मास्क लावला नसल्याने, नागरिकांनी त्यांना मास्कबाबत विचारणा केली, तरीही त्यांनी मास्क लावला नाही.

गणेश कॉलनीत तीन दिवसांनी आले सफाई कर्मचारी

जळगाव : गणेश कॉलनीत ऐन सणासुदीच्या काळात मनपाचे सफाई कर्मचारी येत नव्हते. २७ मार्चनंतर थेट ३१ मार्च रोजीच गणेश कॉलनी भागात रस्ते झाडणे, गटारे साफ करणे ही कामे करण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी गटारे तुंबून राहिली होती. दररोज या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Municipal employees without masks