Municipal employees plant 'guns' on police foreheads | पालिका कर्मचाऱ्यांनी लावली पोलिसांच्या कपाळावर ‘गन’

पालिका कर्मचाऱ्यांनी लावली पोलिसांच्या कपाळावर ‘गन’

अमनळनेर : थांबा साहेब ! तुमची गन एखाद्या गुन्हेगाराचा जीव घेऊ शकते मात्र आमची गन एखाद्याचा जीव वाचवू शकते... असे म्हणत नगरपालीका अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या चवथ्या दिवशी कर्तव्यावर असणाºया पोलिसांच्या कपाळाला थर्मल गन लावत तपासणी केली.
शहरात लॉकडाऊन असल्याने विविध चौकात पोलीस अधिकारी व कॉन्स्टेबल असे सुमारे ८० जण बंदोबस्ताला आहेत. येणाºया - जाणाºया नागरिकांना अडवून त्यांची कागदपत्रे तपासणे, विनाकारण अथवा नियमबाह्य वाहतूक करताना आढळून आल्यास त्यांना दंड करणे आदी कारवाया सुरू आहेत. यात पोलिसांचा विविध नागरिकांशी संपर्क येत आहे. आणि कोरोनाचा संसर्ग तालुक्यात चहूबाजूने पसरला आहे. नकळत अनेक कोरोना सायलेंट कॅरियर फिरत असल्याने पोलिसांना कोरोना संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही. पोलीस अधिकारी बांधवांचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागाला आदेश देऊन सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची थर्मल स्कॅनिंग करून आॅक्सिमिटरने आॅक्सिजन पल्स मोजून घेण्याचे सांगितले. त्यानुसार शहरात कर्तव्यावर असणाºया सर्व पोलिसांची तपासणी केली. पोलिसांच्या कपाळावर गन लावण्याचे विचित्र मात्र सकारात्मक चित्र आज दिसून आले. अतिक्रमण विभागाचे राध्येशाम अग्रवाल, जगदीश बिº्हाडे, सुरेश चव्हाण, विशाल सपकाळे , यश लोहरे, चंदू बिºहाडे आदींनी चाचणी करून अहवाल सादर केला.

Web Title: Municipal employees plant 'guns' on police foreheads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.