भिलपुरा चौकात मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:02+5:302021-09-23T04:19:02+5:30

गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्त असल्याने महापालिका कर्मचारी सय्यद नासिर अली शौकत अली (वय ४५, रा. बालाजीपेठ) हे अग्निशमन वाहन ...

Municipal Corporation employees beaten in Bhilpura Chowk | भिलपुरा चौकात मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण

भिलपुरा चौकात मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण

गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्त असल्याने महापालिका कर्मचारी सय्यद नासिर अली शौकत अली (वय ४५, रा. बालाजीपेठ) हे अग्निशमन वाहन घेऊन भिलपुरा पोलीस चौकीसमोर रात्री ९.३० वाजता उभे होते. गाडी उभी केल्यावरुन ताज मोहम्मद फते मोहम्मद व शेख करीम शेख ताज मोहम्मद दोन्ही (रा.भिलपुरा)या दोघांनी सय्यद नासीर अली यांच्यासोबत वाद घातला. वादात ताज मोहम्मद याने शिवीगाळ केली तर शेख करीम याने सय्यद नासीर यांच्या कानशिलात लगावली. घटनास्थळावरील इतरांनी मारहाण करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही दोघांनी सय्यद नासीर यांना आमच्या नादी लागू नको, येथे गाडी लावू नको, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी सय्यद नासिर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी ताज मोहम्मद पत्ते मोहम्मद व शेख करीम शेख ताज मोहम्मद या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे करीत आहेत.

Web Title: Municipal Corporation employees beaten in Bhilpura Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.