जळगावात मनपा व पोलीस पथक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:15 IST2021-04-16T04:15:34+5:302021-04-16T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीनंतर गुरुवारी जळगाव शहरात चाैकाचाैकांत पोलीस तैनात करण्यात आले ...

जळगावात मनपा व पोलीस पथक रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीनंतर गुरुवारी जळगाव शहरात चाैकाचाैकांत पोलीस तैनात करण्यात आले होते. शहरातील सराफबाजार, सुभाष चौक, टाॅवर चाैकात एरव्ही असलेली गजबज कमी होती. गोलाणी मार्केट, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. आकाशवाणी चाैक, काव्यरत्नावली चाैक, पांडे चाैकात वाहनधारकांची चाैकशी केली जात होती. तसेच महापालिकेकडून चोरून लपून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने गुरुवारी नवीन बसस्थानकासमोर सुरू असलेल्या चहाची टपरी जप्त केली. गेल्या तीन दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस व आरोग्य विभागाकडून अँटिजेन चाचणी केली जात आहे. बुधवारी काही जणांची चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने त्यांची रवानगी महपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली.