शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-हावडा मेल टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव स्थानकावर २ तास तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2024 10:48 IST

तपासणी  कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली.

भूषण श्रीखंडे, जळगाव: हावडा वरून येणारी मुंबई हावडा मेल  क्रमांक १२८०९ यात टायमर बॉम्ब ठेवलेला असून नाशिक स्थानक येण्यापूर्वी त्याचा स्फोट होणार आहे, अशी धमकी ट्विटर वरून धमकी रेल्वे पोलिसांना मिळली. जळगाव रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे ४. १५ मिनिटाला गाडी येतात रेल्वे पोलीस, जळगाव पोलीस दल व बॉम्ब शोधक पथक तसेच रेल्वे कर्मचारी यांच्याकडून गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणी  कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली. 

सोमवार दि. १४ सकाळी पहाटे तीन वाजून पाच मिनिटाला मध्य रेल्वे विभागाच्या रेल्वे पोलीस दलाला ट्विटर द्वारे मुंबई हावडा मेल मध्ये टायमर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. यात मोठा स्पोट नाशिक स्थानक येण्यापूर्वी होणार  अशी धमकी मिळाली होती. तात्काळ भुसावळ रेल्वे पोलीस दल व जळगाव रेल्वे पोलीस दल तसेच स्टेशन प्रबंधक कौस्तुभ चौधरी यांना तत्काळ माहिती देण्यात आली. जळगाव पोलीस दलाचे बॉम्बशोधक पथकाला देखील माहिती दिल्यावर तत्काळ रेल्वे स्थानकावर हे पथक तपासणीसाठी हजर झाले. गाडी ४.१५ वाजता जळगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर हावडा मेल येताच रेल्वे पोलीस व बॉम्बशोधक पथकाने तब्बल दोन तास ११ मिनिट गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली.

भुसावळ रेल्वे पोलीस दलाचे अशोक कुमार, बॉम्बशोधक पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल कवाडे यांच्यासह पथक, जळगाव व भुसावळ  रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी, जीआरपी कर्मचारी, ट्रेनचे ट्रेन एस्कॉर्टिंग कर्मचारी, कमर्शियल ट्रेन चेकिंग कर्मचारी, स्टेशन प्रबंधक यांनी संपूर्ण रेल्वे ची तपासणी केली. संपूर्ण रेल्वे मध्ये कोणताही टायमर बॉम्ब तसेच स्पोटक पदार्थ सापडले नाहीत. त्यानंतर मुंबई हावडा मेल  जळगाव स्थानकावरून सकाळी ६ वाजून २८ मिनिटाला मुंबईकडे रवाना करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव