रविवारीदेखील मुंबईची विमानसेवा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:14+5:302021-06-21T04:13:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यापासून जळगावची विमान सेवा बंद असून, या रविवारीदेखील विमान सेवा बंदच होती. ...

रविवारीदेखील मुंबईची विमानसेवा बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यापासून जळगावची विमान सेवा बंद असून, या रविवारीदेखील विमान सेवा बंदच होती. विमान कंपनीतर्फे विमान कंपनीचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले असल्यामुळे ही सेवा स्थगितच ठेवण्यात आली असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.
उड्डण योजने अंतर्गंत जळगावला हैदराबाद येथील `ट्रू जेट ` या विमान कंपनीतर्फे विमान सेवा देण्यात येत आहे. अहमदाबाद ते जळगाव व जळगाव ते मुंबई अशी ही सेवा असून, ७२ आसनी विमानाद्वारे ही सेवा सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कोरोना काळात आणि आताही विमान कंपनीतर्फे नियमित विमान सेवा नियमित सुरू आहे. ७ जून पासून सर्वत्र अनलॉक केल्यानंतर विमानाने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. तर जळगावहून अहमदाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. अशा प्रकारे ही विमानसेवा सुरळीत सुरू असतांना, अचानक विमान कंपनीतर्फे विमानाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आल्यामुळे, जळगावची विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, विमानाचे तांत्रिक काम लवकरच पूर्ण होणार असून, त्यानंतर मुंबईची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.