प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:13+5:302021-09-16T04:21:13+5:30
प्रगती विद्यामंदिरात ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत ऑनलाईन पद्धतीने चित्रकला, घोषवाक्य फलक, वक्तृत्व, भाषण, कविता लेखन, निबंध ...

प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रम
प्रगती विद्यामंदिरात ‘बहुरंगी कौशल्य’ उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत ऑनलाईन पद्धतीने चित्रकला, घोषवाक्य फलक, वक्तृत्व, भाषण, कविता लेखन, निबंध लेखन अशा बहुरंगी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद ओसवाल व शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक शोभा फेगडे, शिक्षक संध्या अट्रावलकर, संगीता गोहिल, नम्रता पवार, अविदीप पवार, सारिका तडवी, रमेश ससाणे आदी उपस्थित होते.
००००००००
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील व माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रारंभी कीर्ती नाईक यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन शुभदा नेवे यांनी केले. हिंदी राष्ट्रभाषा निबंध स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात प्रथम क्रमांक सोहम बिऱ्हाडे, द्वितीय क्रमांक दिव्या काटोले, तृतीय क्रमांक जिज्ञासा पाटील, उत्तेजनार्थ क्रमांक ओमकार राख याने पटकावला तसेच आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक हर्षल सपकाळे, द्वितीय क्रमांक आयुष पाटील, तृतीय क्रमांक वेदांत हिवराळे तर उत्तेजनार्थ क्रमांक अनुष्का महाजन हिने मिळवला.
००००००००
पोदार इंटरनॅशनल स्कूल
पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मनस्वी बडगुजर, लोकेश ठाकरे, संतोषी मंडोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त प्राचार्य रमेश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य दीपक भावसार, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, हिरालाल गोराणे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक बेडसे यांनी केले तर रंजना गवळी यांनी आभार मानले.