मुक्ताईनगरनजीक 50 हजाराच्या गांजासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 16:47 IST2017-06-14T16:47:01+5:302017-06-14T16:47:01+5:30
50 हजाराच्या गांज्यासह 98 हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली.

मुक्ताईनगरनजीक 50 हजाराच्या गांजासह दोघांना अटक
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 14 - गुप्त माहितीवरून सापळा रचत मुक्ताईनगर पोलिसांनी 50 हजाराच्या गांज्यासह 98 हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास घडली.
पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोथळी बायपासवरून दुचाकी क्र.(एम.एच.19 सी.बी.7109) या गाडीवरून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक सचिन इंगळे, वंदना सोनुने तसेच कर्मचारी संतोष नागरे, किरण शिंपी, कल्पेश अमोदकर, सुनील बडगुजर व कांतीलाल केदारे यांनी सापळा रचत शेख मेहमूद शेख मेहबूब (वय 49, रा.तांबापुरा, जळगाव) तसेच शेख नईम शेख हमीद (वय 42,रा. भुसावळ) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून 50 हजार रुपये किमतीचा पाच किलो गांजा शिवाय 40 हजार रुपये किमतीची दुचाकी, सात हजार रुपये रोख व एक हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण 98500 चा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.