मुक्ताईनगरात प्रभाग रचना आरक्षण सोडती दरम्यान खडाजंगी
By Admin | Updated: June 28, 2017 14:50 IST2017-06-28T14:50:51+5:302017-06-28T14:50:51+5:30
समांतर मतदार संख्येवर आधारित प्रभाग रचना करण्याची मागणी. तहसीलदार दुपारी 4 वाजता देणार निर्णय

मुक्ताईनगरात प्रभाग रचना आरक्षण सोडती दरम्यान खडाजंगी
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.28- येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात आयोजित मुक्ताईनगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत प्रसंगी महसुल कर्मचारी व नागरिकांन मध्ये जोरदार खडाजंगी झाली.
समांतर मतदार संख्येवर आधारित प्रभाग रचना करा आणि यासह एकाच वॉर्डात पुन्हा तेच आरक्षण कसे? या आक्षेपातून नागरिकांनी या सभेत जोरदार गोंधळ केला. तब्बल दीड तास हा गोंधळ चालला शेवटी नागरिकांनी थेट तहसीलदार रचना पवार यांच्या कडे धाव घेतली आणि आक्षेपाचे निवेदन सदर केले. यावर तहसीलदारांनी प्रभाग रचना व आरक्षणाचा निर्णय दुपारी 4 वाजेर्पयत प्रलंबित ठेवत आरक्षण सोडत जाहीर करणार असल्याचे सांगितले
असे आहेत आक्षेप
1) प्रभाग रचनेत वार्ड क्रमांक 1 चा काही भाग वॉर्ड क्रमांक 6 ला जोडू नये तसेच समांतर मतदार संख्या आधारावर प्रभाग रचना करावी
2) वॉर्ड क्रमांक 5 मध्ये गेल्या पंचवार्षिकला 2 महिला राखीव जागा होत्या यंदा पुन्हा 2 महिला राखीव जागा कशासाठी.
3 ) प्रभाग रचना व आरक्षण सोडती बाबत कर्मचा:यांचे ज्ञान अपूर्ण आहे.
आरक्षण सोडती दरम्यान राजेंद्र माळी, जफर अली, राजेंद्र हिवराळे, रामभाऊ कुंभार, संजय कांडेलकर यांच्यासह सह 40 ते 45 नागरिकांनी आक्षेप घेतले.