शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मुक्ताईनगर तालुक्यात वाघांचा प्राचीन काळापासून अधिवास, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:13 IST

प्राचीन शाश्वत संचार मार्ग

ठळक मुद्दे१८२२मध्ये खान्देशात सुमारे ५०० व्यक्तींचा आणि २०००० गुरांचे बळी वाघांनी घेतल्याची नोंद मे, जून, जुलै १८२२ मध्ये ६० वाघांना ठार करण्यात आले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - खान्देशात विशेषत: मुक्ताईनगर तालुक्यात वाघ आणि इतर वन्यजीवांचा अधिवास अतिशय प्राचीन काळापासून असून या विषयीच्या सुस्पष्ट नोंदी बॉम्बे गॅझेटिअरमध्ये आढळून आल्या आहेत. इतकेच नव्हे १९७०च्या सुमारास एका शेतात वाघाची शिकार झाल्याच्या घटनेलाही स्थानिक लोक उजाळा देतात.१८२२मध्ये खान्देशात सुमारे ५०० व्यक्तींचा आणि २०००० गुरांचे बळी वाघांनी घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे मे, जून, जुलै १८२२ मध्ये ६० वाघांना ठार करण्यात आले होते. तत्कालीन ब्रिटीश सरकारने वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मदतीला स्वतंत्र भिल सेना तयार केली होती. कारण खान्देशापासून संपूर्ण पश्चीम भारताचे क्षेत्र हे वाघ आणि इतर वन्यजीवांनी व्यापलेले होते. विशेषत: १८६२ नंतर उत्तरेला निमाड राज्यापासून (मध्यप्रदेश) पूर्व आणि दक्षिण पूर्वेला हत्ती हिल्स, दक्षिणेला सातमाळाची पर्वतराजी आणि पश्चिमेला डांग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाघांचा अधिवास होता असे, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये म्हटले आहे. उल्लेख असलेले संचारमार्गांचे क्षेत्र म्हणजेच बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख केलेला हाच भूभाग होय. निमाड मध्यप्रदेशमध्ये पश्चिमेला विंद्य आणि सातपुड्याचा मध्यभागी वसलेले आहे.जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेकडील १२० कि.मी. क्षेत्र अजिंठा पर्वतराजिनी व्यापले आहे. महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी सर्वांत उत्तरेकडील, साधारणत: पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी दरम्यानच्या, डोंगररांगा ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. पूर्णा नदीच्या खोड्यात पूर्वेकडे हत्ती हिल्स आहेत. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण पुर्वेकडे मुक्ताईनगर तालुक्यात ३२ किमी परिसर हत्ती हिल्सने व्यापला आहे. या वरून या क्षेत्रात वाघांचे अस्तित्व किती प्राचीन आहे, हे सिद्ध होते.डोलारखेडा नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र स्वातंत्र्यत्तोतर कालखंडातही शिकारीसाठी प्रसिद्ध होते. येथे लांब लांबहून लोक शिकारीसाठी येत असत आणि ग्रामस्थाना बोलाविले जात असे. १९७०च्या सुमारास भागवत नागो इंगळे यांच्या शेतात वाघाची शिकार झाल्याची घटना आपल्याला आठविते, असे इंगळे आणि पंढरी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव