शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मुक्ताईनगर तालुक्यात कंटेनरची मोटारसायकलला धडक- सिंगनूर येथील पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:57 IST

दिशादर्शक फलक नसल्यानेही घेतले बळी

ठळक मुद्दे पती-पत्नी बुलढाणा जिल्ह्यात गेले होते देवदर्शनासाठीघरी परत येत असताना झाला अपघातपुरनाड फाट्याजवळील वळण ठरतेय धोकेदायक

मुक्ताईनगर/उचंदे, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर-कुºहा रस्त्यावर पुरनाड फाट्याच्या पुढे राशाबरड जवळ कंटेनरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत सिंगनूर, ता.रावेर येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना १६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.फिर्यादी जीवन ताराचंद भालशंकर (३२, रा.मस्कावद, ता.रावेर) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची बहीण संध्या किरण मोरे व तिचे पती किरण मानाजी मोरे (दोन्ही रा.सिंगनूर, ता.रावेर) हे त्यांच्याकडील मोटारसायकल (एमएच १९ सीटी ८५३५) ने मलकापूरकडून पुरनाडकडे येत होते. तेव्हा कंटेनर (आरजे १८ जीबी २९५५) वरील चालकाने भरधाव वेगाने कंटेनर चालवून मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. पती-पत्नी हे १५ रोजी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील सुपो पळशी या देवस्थानाला दर्शनासाठी गेले होते आणि रविवारी परत येत असताना हा अपघात झाला.पुरनाड फाट्याजवळील राशाबरड जवळ असलेल्या वळण हे अतिशय धोकेदायक आहे. या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अपघात होऊन अनेक जण ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे हे गरजेचे आहे. पती-पत्नीच्या निधनामुळे सिंगनूर गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातJamnerजामनेर