मुक्ताईनगर येथे खिसेकापूने साधला डाव , ९५ हजार व एक मोबाईल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:19 IST2020-10-26T17:17:30+5:302020-10-26T17:19:14+5:30
खडसेंच्या स्वागत प्रसंगीची घटना

मुक्ताईनगर येथे खिसेकापूने साधला डाव , ९५ हजार व एक मोबाईल लांबविला
मुक्ताईनग : रविवारी मुक्ताईनगर शहरात एनसीपी नेते एकनाथ खडसे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यासाठी खडसे सर्मथकांनी गर्दी केली होती. ही संधी साधुन भुसावळ येथील पाकिटमाराने सात जणांचे खिसे कापुन ९५ हजार व एक मोबाईल लांबविल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील प्रवर्तन चौकात घडली. पाकिटमार आरोपीला पोलीसांनी पकडले असुन त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खडसेंच्या स्वागतासाठी प्रवर्तन चौकात तालुका राष्र्टवादी काॅग्रेस पार्टीतर्फे स्वागताचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यामुळे चौकात गर्दी झाली होती.या गर्दीचा फायदा घेत शेख अकील शेख असगर (वय २१ रा.हौंसींगनगर भुसावळ हल्ली मुक्काम भारतनगर जळगाव ) याने हरिश्चंद्र ससाणे यांचे पॅन्टचे खिशातुन १० हजार, ज्ञानेश्वर पाटील यांचे ५ हजार ,शेख जावीद शेख रहीम यांचे ४० हजार , उमेश सुभाष राणे यांचे १८ हजार व दोन एटीएम कार्ड, शेख फिरोज शेख रशीद यांचे ९ हजार , शेख अल्ताफ शेख इब्राहीम यांचे १३ हजार असे ९५ हजार रोख व युवराज सुखदेव रायपुरे यांचा ८ हजाराचा मोबाईल असा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी हरिश्चंद्र ससाणे यांचे फिर्यादीवरुन शेख अकील शेख असगर याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अकील याला सोमवारी न्यायालयात उभे केले असता त्याला २७ आक्टोंबरपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. तपास सहाय्यक फौजदार सादीक पटवे करीत आहे.