शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मृतात्म्यासह जिवंत जीवालाही शांती देणारे मुक्तीधाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:02 IST

जीवन हे क्षणभंगूर असून आत्माही अमर असून, देह हा नश्वर आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावेच लागेल. पण जाताना ज्या जीवाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या व दु:खात समाधान व आत्म्यांना मन प्रसन्न करून काही वेळ निवांत बसण्याचे साधन म्हणजेच बोदवडचे मध्यवर्ती मुक्तीधाम असे वर्णन करता येईल.

ठळक मुद्देबोदवड शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये बाहेरपेठला सर्वात जुनी स्मशानभूमीसर्वात जुनी संस्था गोरक्षनाथ संस्थेने पुढाकार घेत तिचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले स्मशानभूमीचे नाव बदलून मुक्तीधाम करीत कायापालट ३०० झाडे लावली व त्यांना जगवली ‘मुक्तीधाम’ला दात्यांद्वारे पाण्याची टाकी मिळालीकाहींनी बसण्यासाठी ओटे बांधून दिले

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : जीवन हे क्षणभंगूर असून आत्माही अमर असून, देह हा नश्वर आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावेच लागेल. पण जाताना ज्या जीवाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या व दु:खात समाधान व आत्म्यांना मन प्रसन्न करून काही वेळ निवांत बसण्याचे साधन म्हणजेच बोदवडचे मध्यवर्ती मुक्तीधाम असे वर्णन करता येईल.बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये बाहेरपेठला सर्वात जुनी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीला सन १९९० च्या दशकात उतरती कळा आली होती. त्यावेळेस शहरातील सर्वात जुनी संस्था असलेली गोरक्षनाथ संस्थेने पुढाकार घेत तिचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले व त्यास त्यावेळेस सरपंच असलेले धनराज जैस्वाल, सदस्य कैलास चौधरी, कैलास माळी आदींनी सहमती दर्शवली आणि त्यावेळेस स्मशानभूमीचे नाव बदलून मुक्तीधाम करीत त्याचा कायापालट करण्याचे काम गोरक्षनाथ संस्थेच्या हाती आले. त्यांनी त्या ठिकाणी मुक्तीधामची देखरेख व साफसफाई करण्यासाठी ३० वर्षीय त्र्यंबक रामा तेली यास नियुक्त केले. प्रेताला घेऊन अग्निडाग, अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या आप्तमंडळींसमोर दानपेटी फिरवण्याचे ठरले. त्यात सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु त्या घडीला न डगमगता पदरमोड करीत गोरक्षनाथ संस्थेने सुरवातीला ३०० झाडे लावली व त्यांना जगवली.काहींनी झाडाजवळ बसण्यासाठी बाके मृतात्म्याच्या स्मृत्यर्थ दिली तर काहींनी बसण्यासाठी ओटे बांधून दिले. यातून बरीच प्रेरणा मिळत गेल्याने स्मशानभूमीचे रूप बदलले व ‘मुक्तीधाम’ झाले.याच ‘मुक्तीधाम’ला दात्यांद्वारे पाण्याची टाकी मिळाली, तर स्मशानभूमीत महादेवाची मूर्ती बसवून त्याला आणखी सुशोभित करण्याचे कार्य संस्थेने सुरूच ठेवले आहे. यामुळे मृतात्म्याला निरोप देण्यासाठी मुक्तीधामला येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. झाडे जगली व वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे या म्हणीचा कित्ता गिरवत आज शहरात पाच स्मशानभूमी आहेत. परंतु सर्वात सुंदर व दाट झाडीच्या सान्निध्यात मृतात्म्यासह आलेल्या जिवंत जीवांनाही काही काळ विसावा घेण्यास मजबूर करणारी अशी ही स्मशानभूमी ‘मुक्तीधाम’ ठरली आहे. झाडे जगवून त्यांचा सांभाळ व मुक्तीधामला सुशोभित करणारे गोरक्षनाथ संस्थेचे कार्य सुरूच आहे.साफसफाई, बसण्यासाठी बाके, प्रेतासाठी लागणारी किडी, अंत्यसंस्काराचे ओटे, पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे, दररोज शेकडो झाडांना पाणी देण्याचे कार्य यासाठी ते दर महिन्याला पदरमोड करीत किमान दहा हजार रुपये खर्च करतात. त्यात काही मदत दानपेटीतून, तर बाकी खर्च संस्था करते. त्यात आपली फक्त हजार रुपये महिन्यावर रात्रंदिवस सेवा देणारा त्र्यंबक आज साठी ओलांडत आहे. डोळे अंधूक झाले आहे. पाय काठीच्या सहाºयाने चालतात. तरी एका हातात काठी तर दुसºया हातात दानपेटी फिरवत त्र्यंबक आता तिरमक झाला आहे, पण त्याची ही सेवा सुरूच आहे. तेथेच मुक्तीधामला एका खोलीत तो बसलेला असतो. मृतकाच्या नातलगांना सरपण तसेच संस्थेकडून शव शीतपेटी, किडी, उपलबध करून देण्यास मदत करतो, तर मृतदेहाला अग्निडाग दिल्यानंतर त्याची देखरेख व पूर्ण सुरक्षा करण्याचे कार्य विना काही मोबदल्याने करतो, तर गोरक्षनाथ संस्थेचे अध्यक्ष विजय बडगुजर असून, यावर ते लक्ष ठेऊन असतात तर त्यांचे सहकारी कैलास माळी, अशोक बडगुजर हे दररोज सकाळी मुक्तीधामच्या पाहणीसाठी येत असतात. यासाठी त्यांना नगरपंचायतीकडून कोणतीही मदत मिळत नाही.सर्वांना शेवटी येथेच (मुक्तीधाम) येणे आहे. शहरवासीयांच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. मला या सेवेतून आत्मिक समाधान मिळते. शेवटी हा जन्म असा लाभावा, त्याचा चंदन व्हावा, अस्तित्व संपले तरी सुगंध दरवळत रहावा.-विजय बडगुजर, अध्यक्ष, गोरक्षनाथ संस्था, बोदवड

टॅग्स :SocialसामाजिकBodwadबोदवड