केसावर फुगे आणि खडतर जीवन जगतोय मुकेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 03:50 PM2020-10-10T15:50:29+5:302020-10-10T15:57:37+5:30

‘केसावर फुगे’ या खान्देशी गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Mukesh is living a tough life with bubbles on his hair | केसावर फुगे आणि खडतर जीवन जगतोय मुकेश

केसावर फुगे आणि खडतर जीवन जगतोय मुकेश

Next
ठळक मुद्देसंडे स्पेशल...वस्तुस्थिती‘केसावर फुगे’ खान्देशी गाणे झाले लोकप्रियता मिळवल्यानंतर फुगे हॅश टॅगने मिळवला मोठा ट्रेण्ड

मतीन शेख ।
मुक्ताईनगर : ‘केसावर फुगे’ या खान्देशी गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. राष्ट्रीय राजकीय नेत्यापासून तर गावपुढाऱ्यापर्यंत उपहासात्मक टीकेसाठी केसावर फुगे बोलणारे धनी अनेक, तर सोशल मीडियावर केसावर फुगे या ‘हॅश टॅग’नेही मोठा ट्रेंड मिळविला, परंतु वास्तविक जीवनात केसावर फुगे देऊन व्यवसाय करणारे कुटुंब आजही खडतर जीवन जगत आहे.
केसावर फुगे विकणाºया कुटुंबियांचा हा पारंपरिक व्यवसाय. दिवसभराची गावभर पायपीट करून दोन वेळच्या जेवणाची सोयदेखील होत नाही, हे वास्तव या व्यवसायात असलेल्या मुक्ताईनगर येथील आसलकर कुटुंबाची भेट घेतल्यानंतर समोर आले.
केसांवर फुगेवाले बाबा
मुकेश रामभाऊ आसलकर हा साठीतला इसम तालुक्यातील अनेक गावात गल्ल्यांमध्ये केसांवर फुगे असा आवाज देताना अधूनमधून दिसतो. लहान मुलांना फुगे आवडतात. या फुगेवाल्या बाबाचा आवाज येताच आई आणि आजीने केस विंचरताना गळलेले आणि घरातील खिडकी आणि कोपºयात जमा करून ठेवलेले केस काढतात आणि आसलकर बाबाकडे देऊन बदल्यात फुगे घेतात. अधिकचे फुगे मिळावे म्हणून बालके मोलभाव करताना दिसतात.
स्वातंत्र्यापूर्वीपासून पारंपरिक व्यवसाय
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आसलकर कुटुंबाचा केसावर फुगे विक्री हा व्यवसाय आहे. भटके जीवन जगणाºया या कुटुंबात मुकेश आसलकर यांचे आजोबा गुरुदास आसलकर यांच्यापासून त्यांच्या कुटुंंबात केसावर फुगे हा व्यवसाय सुरू झाला. त्यांची ही परंपरा आज वडील रामभाऊ आसलकर, स्वत: मुकेश आसलकर आणि आता त्यांची तीन मुले दीपक, संदीप, चेतन यांच्यासह पत्नी आणि सून असे एकाच कुटुंबातील सात जण दररोज फिरस्ती करून केसांवर फुगे हा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत.
खडतर जीवन
कुटुंबातील एक सदस्य दिवसभर पायपीट करून १०० ग्रॅमच्या घरात केस मिळवतो. त्यामागे १५० ते २०० फुगे दिले जातात. कुटुंंबातील ५ ते ७ सदस्य दररोज भटकंती करतात. पण कधी कधी दोन वेळच्या जेवणाचा खर्चही निघत नाही. किमान ४ ते ५ किलो जमा केले तरच केस मलकापूर व जळगाव येथील घाऊक व्यापारी घेतात. तोपर्यंत उधारीवर किराणा घ्यायचा आणि चार-पाच किलो केस जमा झाल्यावर विकून उधारी फेडायची, असं जगणं सुरू असल्याचे या कुटुंंबाचे म्हणणे आहे.
विग आणि गंगावन होतात तयार
जमा झालेल्या केसांना प्रतवारीनुसार ३०० ते २००० पर्यंत भाव मिळतो. यात मेंदी केलेले केस ३००, पांढरे केस ५००, सर्वसाधारण ७०० ते १५०० आणि लांब व चांगल्या प्रतीचे २ हजार रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. या केसांची विग आणि गंगावन बनविणाºया कंपनीत मागणी असते तर बैलांच्या गळ्यात व इतर ठिकाणी वापरण्यात येणाºया केसारीही तयार केले जातात.

आम्ही वडिलोपार्जित या व्यवसायात आहे. परंतु चांगले दिवस कधीच आले नाही. कुटुंंबातील ५ ते ७ सदस्य दररोज भटकंती करतात. पण कधी कधी दोन वेळच्या जेवणाचा खर्चही निघत नाही. भटक्यांबाबत शासनाने अनेक योजना केल्याचे म्हणतात, पण आम्हाला कधीच लाभ मिळाला नाही.
-मुकेश आसलकर, केसांवर फुगे विक्रेता, मुक्ताईनगर

आठ दिवसात साधारण ३० किलो माल जमा होतो.
६० ते ७० भटके माल आणतात. केस जमा करणाऱ्यांना दिवसाला १०० रुपये मजुरी निघते. कोलकाता येथील विग कंपनीला आम्ही माल पुरवतो.
-संजय बाबूराव आसलकर, केसांचे घाऊक विक्रेते, मलकापूर

 

Web Title: Mukesh is living a tough life with bubbles on his hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.