महावितरण डमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:49+5:302021-09-15T04:21:49+5:30
विज चोरीसाठी अशीही चलाखी : काही ग्राहक वीजेची चोरी करण्यासाठी मीटरला चुंबक लावून गती कमी करण्याचा प्रयत्न करित असतात. ...

महावितरण डमी जोड
विज चोरीसाठी अशीही चलाखी :
काही ग्राहक वीजेची चोरी करण्यासाठी मीटरला चुंबक लावून गती कमी करण्याचा प्रयत्न करित असतात. तर काही ग्राहक मीटरमध्ये तारा किंवा इतर उपकरणे लावून मीटर बंद करत असतात. मात्र, संबंधित ग्राहकाने कुठल्याही पद्धतीने विजेची चोरी केली, तरी ही चोरी मीटरच्या तपासणीत उघड होत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
जबरी दंड ,अन्यता फौजदारी गुन्हा
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जर एखादा ग्राहक मीटरद्वारे विजेची चोरी करतांना सापडल्यास, त्याचे आधी मीटर जप्त केले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या घरात किती उपकरणे आहेत, दर महिन्याला सरासरी त्या ग्राहकाला किती विज बिल यायचे, आधी मागील बिलांचा अंदाज काढुन त्या ग्राहकाला विज चोरी प्रकरणी दंड आकारण्यात येतो. हा दंड संंबंधित ग्राहकाच्या विजेच्या चोरीनुसार आकारण्यात येत असून, दंड भरण्यासाठी विहीत मुदतही दिली जात आहे. मात्र, संबंधित ग्राहकाने मुदतीत दंड न भरल्यास त्याच्यावर महावितरणतर्फे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
इन्फो :
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर महावितरणतर्फे कारवाई मोहिम राबविण्यात येत आहे. जे ग्राहक अशा प्रकारे, मीटरमध्ये फेरफार करतांना आढळून येत आहेत, त्यांच्या दंडात्मक कारवाई होत असून, दंड न भरणाऱ्यांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करू नये.
फारूख शेख, अधिक्षक अभियंता, महावितरण