श्री संत मुक्ताई विठ्ठलाच्या भेटीला
By Admin | Updated: May 30, 2017 13:25 IST2017-05-30T13:25:25+5:302017-05-30T13:25:25+5:30
मुक्ताईनगर : पालखी सोहळा रवाना
श्री संत मुक्ताई विठ्ठलाच्या भेटीला
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.30 - श्री संत मुक्ताई पालखी सोहळा श्री विठ्ठलाच्या भेटीला मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे निघाला़ तब्बल 700 किलोमीटर अंतराचा पायी प्रवास असलेल्या हा सोहळा असून आषाढातील महाराष्ट्रातील पहिली पालखी श्री विठ्ठलाच्या भेटीला निघाली आह़े 4 जुलै रोजी पंढरपूरात पालखी पोहोचणार आह़े
दरम्यान, मंगळवारी सकाळी 10 वाजता पालखी पूजन अॅड़रवींद्र पाटील, तहसीलदार रंजना पवार, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त संदीप रवींद्र पाटील, सरपंच ललित महाजन, उद्धव महाराज जुनारे, ह़भप रवींद्र महाराज हरणे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री क्षेत्र कोथळी येथील जुन्या मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली़ चांदीच्या रथात संत मुक्ताईच्या पादुका ठेवण्यात आल्या़
दरम्यान, पंढरपूर पायी दिंडीत जे भाविक सहभागगी होवू शकत नाही त्यांनी कोथळी ते मुक्ताईनगर्पयत पायी दिंडीत सहभाग नोंदवला़