शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्तेवर येणार टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:39 IST

एकनाथराव खडसे

जळगाव : श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीने १७ वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडून घेतलेले आठ कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याने व सदर कर्जाची हमी घेतलेल्या संचालकांनी दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी बँक संबंधित १० संचालकांच्या मालमत्तेवर बोझा लावणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या संचालकांमध्ये माजी आमदार मनीष जैन यांचाही समावेश आहे.जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येऊन या विषयी माहिती देण्यात आली. या वेळी एकनाथराव खडसे यांच्यासह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, चिमणराव पाटील, रवींद्र पाटील, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील, आमदार सुरेश भोळे, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.या वेळी माहिती देताना खडसे म्हणाले की, श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीने २००२मध्ये जिल्हा बँकेकडून आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या वेळी क्रेडीट सोसायटीचे संचालक मनीष ईश्वरलाल जैन, सुरेंद्र नथमल लुंकड, सुभाष सागरमल साखला, महेंद्र दुर्लभ शाह, सुरेंद्र बन्सीलाल जैन, अजित बन्सीलाल कुचेरिया, तुळशीराम खंडू बारी, सपना अश्विन शाह, अपना अजय राका, सुरेशकुमार आनंदराजजी टाटिया या १० संचालकांनी कर्ज वसुलीबाबत हमीपत्र लिहून दिले होते. तरीदेखील हे कर्ज थकले आहे.सहकार न्यायालयाने संचालकांवर ठेवली जबाबदारीकर्ज थकल्याने जिल्हा बँकेने सदर संस्था व संचालक मंडळाविरुद्ध सहकार न्यायालयात १७ कोटी ५८ लाख ३ हजार ३८३ रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी लवाद दावा (क्र. २४९/२०१०) दाखल केला. त्याचा निकाल जिल्हा बँकेच्या बाजूने लागून संचालक मंडळावर कर्ज व त्यावरील व्याजाची वसुलीची जबाबदारी ठेवली, असल्याचे खडसे म्हणाले.धनादेश अनादरप्रकरणी फौजदारी खटलाकर्ज फेडण्यासाठी श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्यावतीने जिल्हा बँकेला तीन कोटी व पाच कोटी रुपयांचे धनादेश देण्यात आले. त्यावर मनीष ईश्वरलाल जैन, सुरेंद्र नथमल लुंकड, सुभाष सागरमल साखला, विश्वनाथ रामसिंग पाटील यांच्या सह्या असून हे धनादेश वटले नाही. धनादेश अनादर प्रकरणी जिल्हा बँकेने फौजदारी खटला दाखल केला होता. त्याचाही निकाल बँकेकडून लागून ११ कोटी रुपये कॉम्पेशेशन व संंस्थेला २५ हजार रुपयांचा दंड व आरोपींना एक वर्ष साधी शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले असून त्यात ५० लाख रुपये कॉम्पेशेशन भरले आहेत.आजपासून कार्यवाही करणारश्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या स्वमालकीच्या इमारतीचे अवास्तव मुल्यांकन देण्यासह बनावट कागदपत्रे सादर केल्यानेही जिल्हा बँकेने सदर संस्था व संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. कर्ज वसुलीसाठी बँक आता थेट संबंधित संचालकांविरुद्ध थेट कारवाई करणार असून ९ मे पासून संचालकांच्या मालमत्तेवर बोझा बसविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.माजी आमदार अडचणीतश्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या कर्ज प्रकरणात माजी आमदार मनीष जैन यांनीही हमीपत्र लिहून देण्यासह धनादेश दिले होते. मात्र कर्जफेड न होण्यासह धनादेशही न वटल्याने अमदार जैनदेखील जिल्हा बँकेच्या कारवाईमुळे अडचणीत आले आहेत.या प्रकरणी न्यायालयाचा जो आदेश असेल तो मान्य राहणार आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने या बाबत बोलणे योग्य नाही. राजकीय खेळीतून हेतूपुरस्सर ही कारवाई होत आहे.- मनीष जैन, माजी आमदार तथा तत्कालीन संचालक.

टॅग्स :Jalgaonजळगाव