शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील दांडीबहाद्दर अधिका-यांवर खासदारांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:33 IST

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीबाबत अधिका-यांना गांभीर्य नसल्याने नाराजी व्यक्त करीत रद्द केली बैठक

ठळक मुद्देजिल्ह्यातील प्रमुख अधिका-यांनी गैरहजर राहत पाठविले प्रतिनिधीजिल्हाधिका-यांनी प्रमुख अधिकारी नसल्याने बैठक रद्द करीत असल्याचे केले जाहिरखासदार ए.टी.पाटील व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केली नाराजी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ - जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख अधिका-यांनी दांडी मारल्याने शनिवारी आयोजीत करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. अधिकारीच अनुपस्थित असल्याने रस्ते, अपघात व वाहतुकीच्या समस्या कोणापुढे मारणार? असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित करीत ही बैठक रद्द करण्याचा सूचना दिल्यानंतर, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बैठक रद्द झाल्याची माहिती दिली.जिल्ह्यातील अपघातांची माहिती, रस्ता सुरक्षा विषयक अंमलबजावणीची माहितीसह वाहतुकीची समस्या, या विषयांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. बैठकीला समितीचे अध्यक्ष खासदार ए.टी.पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व महापौर ललित कोल्हे उपस्थित होते. मात्र जे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित असणे गरजेचे होते. त्याच अधिका-यांनी या बैठकीला महत्व न देता पाठ फिरविल्याने खासदार ए.टी.पाटील व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :JalgaonजळगावMLAआमदारcollectorतहसीलदार