एमपीआयडी कायद्यामुळे बीएचआरची वाहने मिळण्यास अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:28+5:302021-08-24T04:21:28+5:30

जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूकप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी बीएचआर पतसंस्थेच्या मालकीची दोन वाहने ...

MPID Act hinders access to BHR vehicles | एमपीआयडी कायद्यामुळे बीएचआरची वाहने मिळण्यास अडथळा

एमपीआयडी कायद्यामुळे बीएचआरची वाहने मिळण्यास अडथळा

जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूकप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी बीएचआर पतसंस्थेच्या मालकीची दोन वाहने (कार) जप्त केलेली आहेत. एमपीआयडी कायद्यान्वये वाहन जप्तीची कारवाई करण्यात आल्यामुळे ती नूतन अवसायक अर्थात संस्थेला देता येणार नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे अवसायकांसमोर आणखी एक नवीन अडचण निर्माण झाली आहे.

चैतन्यकुमार हरिभाऊ नासरे (रा.नागपूर) यांनी ८ मार्च रोजी बीएचआर पतसंस्थेच्या अवसायक पदाचा पदभार घेतला. कार्यालय सील असल्याने पहिल्याच दिवशी त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या दालनात बसून कामकाज पाहिले. सील उघडण्यासापासून तर जप्त हार्डडिस्क परत मिळण्यासाठी त्यांनी पुणे पोलीस व न्यायालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. कार्यालयाचे सील उघडले असले तरी अजून हार्डडिस्क मिळालेली नाही. त्याशिवाय वसुली, मालमत्तांची पाहणी यासह संस्थेच्या इतर कामकाजासाठी चारचाकी वाहन आवश्यक आहे. संस्थेच्या दोन कार पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. त्या मिळण्यासाठी अवसायक नासरे यांनी पुणे पोलिसांकडे पाठपुरावा केला.

पोलिसांनी न्यायालयाला दिले पत्र

या गुन्ह्याच्या तपासाधिकारी सुचेता खोकले यांनी १२ ऑगस्ट रोजी विशेष न्यायालयाला पत्र देऊन जप्त वाहनांबाबत माहिती कळविली आहे. २७ नोव्हेंबर २०२० रोजी जितेंद्र कंडारे याच्या घरझडतीत एक कार (आर.जे. १४ सी.एक्स. ०७१) जप्त केली आहे तर दुसरी कार (एम.एच. १९ बी.यू. २३२३) कमलाकर कोळी याच्या ताब्यातून २९ नोव्हेंबर २०२० रोजी जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही कार बीएचआर संस्थेच्या मालकीच्या असल्या तरी एमपीआयडी कायद्यान्वये त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या अवसायकाच्या ताब्यात देता येणार नसल्याचे कारण दिले आहे.

Web Title: MPID Act hinders access to BHR vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.