अमळनेर तालुक्यातील चौघांविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव
By Admin | Updated: July 8, 2017 16:52 IST2017-07-08T16:52:46+5:302017-07-08T16:52:46+5:30
वाळू चोरांची मुजोरी आणि पर्यावरणाचा :हास पाहता जिल्हाधिका:यांनी दिलेल्या सूचनेनुसार अमळनेरातून चार जणांचे एम.पी. डी. ए.चा प्रस्ताव पाठवण्यात येणार

अमळनेर तालुक्यातील चौघांविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव
ऑनलाईन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि.8 - वाळू चोरांची मुजोरी आणि पर्यावरणाचा :हास पाहता जिल्हाधिका:यांनी दिलेल्या सूचनेनुसार अमळनेरातून चार जणांचे एम.पी. डी. ए.चा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी लोकमत शी बोलताना दिली
अमळनेर तालुक्याला पांझरा, तापी , आणि बोरी नदी अशा तीन नद्या लागून असून वाळू चोरांचा सुळसुळाट झाला होता. राजकीय दबावामुळे वाळू चोरांना चांगलेच फावले होते तलाठी, तहसीलदारांना धमक्या देणे हुज्जत घालणे ट्रॅक्टर पळवून नेणे असे प्रकार वारंवार होत असल्याने प्रशासन हादरले होते , नद्यांमध्ये वाळूच शिल्लक नसल्याने सिंचन होत नव्हते पर्यावरणाचा :हास होत होता जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी गंभीर दखल घेऊन वाळू चोरांवर एम पी डी ए प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत त्यामुळे अमळनेर तहसीलदार प्रदीप पाटील यांनी वाळू चोरीचे गुन्हे दाखल झालेले आणि दंड भरलेले आशा व्यक्तींवर एम पी डी ए प्रस्ताव पाठवण्याची तयारी दर्शविली आहे. चार जणांचे प्रस्ताव तयार झाले असून ते जिल्हाधिका:यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.