खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली पालिकेची विभागनिहाय झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:39+5:302021-06-16T04:22:39+5:30

खासदार पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पालिकेच्या विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी नितीन ...

MP Unmesh Patil took over the division of the municipality | खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली पालिकेची विभागनिहाय झाडाझडती

खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली पालिकेची विभागनिहाय झाडाझडती

खासदार पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पालिकेच्या विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी नितीन कापडणीस, पालिकेतील गटनेते संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, मुख्य अभियंता विजय पाटील, उप मुख्याधिकारी स्नेहा फडतरे, सभा लिपिक विजय खरात, पाणीपुरवठा अभियंता राजीव वाघ, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी, संजय गोयर, सचिन निकम, वीज अभियंता कुणाल महाले, योगेश मांडोळे, लेखापाल कुणाल कोष्टी, नगर अभियंता नितीन देवरे, संगणक अभियंता महेश शिंदे, करनिरीक्षक राहुल साळुंके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

तीन तास चालली बैठक

खासदार पाटील यांनी प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना, आदेश देत पालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नसल्याचे कारण सांगून विभागांमध्ये मरगळ आली असून आपापल्या विभागातील कामाबाबत नागरिकांच्या शहरातील धूळयुक्त रस्ते, पथदिवे, पाणी, स्वच्छता आदी तक्रारींचा निपटारा करा, असे आदेश यावेळी त्यांनी दिले.

शहरातील चौकांचे सुशोभीकरण मार्गी लावा

अकरा नंबर शाळेतील इनडोअर स्टेडियम, खरजई नाका चौक, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यालय वसतिगृह चौक, पोलीस स्टेशन समोरील सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बांधकाम, चौकाचे विस्तारीकरण या कामांबाबत पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा चौक देखणा व्हावा, यासाठी वाहतुकीस अडचण ठरणारा स्टेशन रोडकडील कारंजा बांधकाम काढून टाकण्याच्या सूचना यावेळी दिल्या. याप्रसंगी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औरंगाबादच्या धर्तीवर तिरंगा झेंडा बसविणार

औरंगाबाद येथील क्रांती चौकाजवळ २१० मीटर उंच तिरंगा झेंडा उभारला आहे. याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असलेल्या कारंजा चबुतरा असलेल्या जागी तिरंगा झेंडा बसविणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली असून यासाठी मुख्याधिकारी नितीन कापडणीस, नगर अभियंता विजय पाटील, वास्तू विशारद प्रशांत देशमुख यांनी याबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही केली.

===Photopath===

150621\15jal_4_15062021_12.jpg

===Caption===

चाळीसगाव येथे खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नगरपालिकेच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार उन्मेश पाटील, सोबत नगराध्यक्षा आशालता चव्हाण, संजय पाटील, घृष्णेश्वर पाटील, नितीन कापडणीस व अन्य.

Web Title: MP Unmesh Patil took over the division of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.